Share

cover art for औदुंबर | Audumbar

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

औदुंबर | Audumbar

Season 1, Ep. 132

औदुंबर

औदुंबर ही जागा डोळ्यांना सुखावणारी तर आहेच पण मनालाही एक वेगळीच शांती तिथे मिळते. तो घाट, हिरवळ, नदीचं झुळझुळ वाहणारं पाणी, ती सुंदर मूर्ती यांनी आपण भारवून नाही गेलो तर नवलच. चला तर दंग होऊन जाऊया आपणही औदुंबर क्षेत्री.


1. श्री क्षेत्र औदुंबर

 कवी - बा भ बोरकर

कवितासंग्रह - कैवल्याचे झाड


2. औदुंबर

कवी - प्रकाश खोटे

कवितासंग्रह - साधना

More episodes

View all episodes

  • 137. साथ नभाची | Saath Nabhachi

    06:30||Season 1, Ep. 137
    साथ नभाचीकापसासारखे पांढरे शुभ्र, काळे कुट्ट, वाऱ्यासोबत पळणारे असे हे ढग आकाशात वेगळाच खेळ खेळत असतात. कधी ते सुखावतात तर कधी त्रास देतात. चला तर लागुया ढगांच्या मागे कवितांसोबत.1. ढग येतात कवी - शांता शेळके कवितासंग्रह - गोंदण2 . साथ नभाची असेकवी - नलेश पाटीलकवितासंग्रह - हिरवं भान
  • 136. पंधरा ऑगस्ट | 15 August

    05:42||Season 1, Ep. 136
    पंधरा ऑगस्टपंधरा ऑगस्ट हा भारतीय इतिहासात कोरलेला सुवर्ण दिवस. यासाठी लाखो लोकांनी स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं, त्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, बलिदान दिलं. तेव्हा कुठे हा सोनियाचा दिनु आपल्या भाळी आला. पण आपण सर्व त्यांच्या स्वतंत्र भारताच्या स्वप्नात आपली भूमिका चोखपणे पार पाडतोय का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चला तर मग साजरा करूयात स्वातंत्र्यदिन.1. तिरंगा कवी - मिलिंद जोशीकवितासंग्रह - असेच होतं ना तुला ही...2. 15 ऑगस्ट कवी - अशोक बागवेकवितासंग्रह - कवितेच्या गावा जावे
  • 135. अक्षरमौन | Aksharmaun

    04:55||Season 1, Ep. 135
    अक्षरमौनएक चकारही न काढता ही अक्षरं बोलतात ना. या शब्दांना, अक्षरं , क्रियापदे यांना एक वेगळं वजन असतं. ते आपण कुठं, कधी आणि कसं वापरतो यावर आपण काही बनवू शकतो किंवा सगळं काही बिघडवू शकतो. चला तर मग त्यांची ताकद आजमवूया कवितांतून.1 . अक्षरमौनकवी - सौमित्रकवितासंग्रह - आणि तरिही मी...2. क्रियापदकवी - वसंत आबाजी डहाकेकवितासंग्रह - चित्रलिपी
  • 134. वास्तव | Vaastav

    04:35||Season 1, Ep. 134
    वास्तवआपण सर्वजण वास्तवापासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही लोक निधड्या छातीने त्याचा सामना करतात आणि एक वेगळं जग निर्माण करतात जे त्यांच्या इच्छेनुसार चालतं. चला तर करुया वास्तवाशी चार हात.1. वास्तवकवी - मंगेश पाडगावकरकवितासंग्रह - शब्द2. वास्तवकवी - वसंत आबाजी डहाकेकवितासंग्रह - चित्रलिपी
  • 133. भोवरा | Bhovara

    04:54||Season 1, Ep. 133
    भोवरा कधी आपण याला फिरवतो तर तो कधी आपल्याला. भोवरे हे असतातच. खेळण्यातला भोवरा तर भाव खाऊन जातोच पण आयुष्यातले भोवरे ही काही कमी नसतात. चला तर एक गिरकी घेऊच कवितांच्या भोवऱ्यासोबत.1. भोवराकवी - के ना डांगे कवितासंग्रह - बालभारती2. भोवराकवी - इंदिरा संत कवितासंग्रह - निराकार
  • 131. सिग्नल्स | Signals

    04:53||Season 1, Ep. 131
    सिग्नल्स लाल, हिरवा, पिवळा, धोका, सावधान , पुढे जा अशी असंख्य सिग्नल्स रस्त्यावरती आणि आयुष्यात आपल्याला मिळत राहतात. काही आपला जीव वाचवतात, काही आपल्याला नवीन गोष्टी शिकवतात, तर काही आयुष्य पलटून टाकतात. चला तर बघुया कोणते सिग्नल्स मिळतायत ते.1. सिग्नल्सकवी - सौमित्रकवितासंग्रह- बाउल2. ग्रीन सिग्नलकवी - निरंजन उजागरेकवितासंग्रह - कवितांच्या गावा जावे
  • 130. विठ्ठलाची ओटी | Vithalachi Oti

    04:26||Season 1, Ep. 130
    विठ्ठलाची ओटी लाखो भाविक ' जय हरी विठ्ठल ' च्या गजरात जरवर्षी हरवून जाऊन पंढरीला पोहचतात. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने त्यांना वेगळाच आनंद मिळतो. ती चंद्रभागा , तो सावळा विठ्ठल आणि ती पंढरी नेहमीच भक्तांना खुणावत असते. चला हरवून जाऊयात हरिनामाच्या गजरात.1. विठ्ठलाची ओटीकवी - वैभव जोशीकवितासंग्रह- म्हणजे कसं की..2. सांगताकवी - बा भ बोरकरकवितासंग्रह- कैवल्याचे झाड
  • 129. दहावीच्या बाईस | Dahavichya Bai

    07:44||Season 1, Ep. 129
    दहावीच्या बाईस आपल्या सर्वांच्या शैक्षणिक काळामध्ये असे काही हाडाचे शिक्षक आपल्याला भेटतात की त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याची दिशाच बदलून जाते. कधी रागावतात, दटावतात, तर कधी प्रेमाने जवळ घेऊन कौतुकाची थापही पाठीवर देतात. अश्या आपल्या लाडक्या बाई, सरांसाठी काही कविता.1. प्रिय बाईसकवी - प्रवीण दवणेकवितासंग्रह - गंधखुणा 2. दहावीच्या बाईकवी - निरंजन उजगरेकवितासंग्रह - नवी घरे